डॉ. हेडगेवार भवन, स्मृती मंदिर परिसर येथील महर्षी व्यास सभागृह - रेशीमबाग नागपुर येथे समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ (सक्षम) तर्फे रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ११ ते दुपारी ५ वाजे पर्यंत पार पडलेल्या “दिव्य-क्षम २०२४” एक दिवशीय प्रांत अधिवेशना मध्ये
सुरवातीला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त दिव्यांग सौ. शितल किंमतकर व्दारे जादूचे प्रयोग दाखवण्यात आले. त्यानंतर अधिवेशनाच्या एक आठवड्यापूर्वी निधन झालेले सक्षम विदर्भ प्रांत अध्यक्ष स्व. सुधाकरदादा इंगोले यांना श्रद्धांजली देण्यात आली.
उद्घाटन सत्र मध्ये "दिव्य-क्षम 2024 " या विशेषांक चे विमोचन मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या विशेष अंकात एकूण 22 लेख असून विदर्भातील सक्षम चे कार्य, गतिविधि व दिव्यांगांच्या विविध समस्या यावर प्रकाश टाकणारे अभ्यासपूर्ण लेख आहेत. या सोबतच सक्षम नागपूर
www.sakshamngp.org वेबसाईट चे लोकार्पण श्री. निखिल मुंडले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अधिवेशनाच्या अध्यक्ष सुश्री सौम्य शर्मा ( CEO जिल्हा परिषद नागपुर ) श्री नवीन शहा (प्रबंध आणि निदेशक NHFDC नवी दिल्ली ) श्री श्रीधर जी गाडगे ( प्रांत संघचालक रा स्व संघ विदर्भ ) श्री विजयसिंह मोहता (उपाध्यक्ष सक्षम विदर्भ ) डॉ मिलिंद हरदास (अध्यक्ष सक्षम नागपुर महानगर ) अधिवेशन संयोजक डॉ संदीप पथे यांची मंचावर उपस्थिती होते.
आपल्या प्रास्ताविक भाषणात डॉ. संदीप पथे यांनी "दिव्य-क्षम २०२४" अधिवेशना चा उद्देश व "दिव्य-क्षम" नावा चा उलगडा केला. या सोबत सक्षमचे कार्य आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातून सहभागी झालेल्या दिव्यांग बंधू- भगिनीं चे तसेच संस्था, शाळा, कर्मशाळा व निवासी शाळा यांचे स्वागत व अभिनंदन केले.
"दिव्य-क्षम" अधिवेशना च्या उद्घाटक व अध्यक्षा सुश्री सौम्या शर्मा यांनी उपस्थितांना मराठीतून मार्गदर्शन केले व सक्षम द्वारा चालविल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांची स्तुती केली. सक्षम च्या माध्यमातून दिव्यांगांचे सशक्तिकरण कार्याचे अभिनंदन केले. प्रमुख पाहुणे श्री नवीन शहा यांनी केंद्र सरकारच्या योजना तसेच दिव्यांगां साठी स्वयंरोजगार या विषयावर मार्गदर्शन केले व याला लागणारे सर्व प्रकारची प्रशिक्षण आणि सहाय्यता NHFDC तर्फे करण्याची तयारी दाखवली. मा. श्री. श्रीधरराव गाडगे यांनी समर्पित कार्यकर्त्यांची फळी, दिव्यांग व सौ व्यांग दोन्ही प्रकारच्या कार्यकर्त्यांनी सक्षम चे काम व संघटनात्मक बांधणी मजबूत कशी करावी यावर प्रकाश टाकला. सक्षम च्या कार्यकर्त्यांना अतिशय प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शन प्राप्त झाले.
"दिव्य-क्षम २०२४" अधिवेशनात शिक्षण, कला, क्रिडा, उद्योग आणि व्यवसाय इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय व असामान्य कर्तुत्व करणाऱ्या व समाजात आपला अमिट ठसा उमटविणाऱ्या विदर्भ क्षेत्रातील ७ दिव्यांग बंधू - भगिनीं चा सत्कार आणि सन्मान करण्यात आला.
ज्या मध्ये अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका येथील ढगा या छोट्या गावातील अस्थीबाधीत दिव्यांग चित्रकार श्री डॉ युवराज ठाकरे समावेश होता. नागपुरातील जलतरण खेळाडू कुमारी ईश्वरी पांडे, योग क्षेत्रातील आकाश बुरडे, सायकल पटू दिलीप भोयर, शितल किंमतकर यांचा समावेश होता.
या अधिवेशनात दिव्यांगांद्वारे उत्पादित विविध वस्तूंची विक्री व प्रदर्शन चे २२ स्टाल्स उपलब्ध करण्यात आले होते. या स्टॉलवर मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची विक्री झाली.
अधिवेशना च्या दुसऱ्या सत्रात श्री उत्कर्ष खोपकर ( दिव्यांग) सन एन्व्हायरो प्रायव्हेट लिमिट चे मालक यांचे मोटिवेशनल स्पीच, PPT व्दारे केले व सोबतच श्री सुहास काळे यांचे दिव्यांग क्षेत्रात केलेल्या कार्याचे अनुभव कथन झाले.
दिव्य-क्षम अधिवेशनाच्या तिसऱ्या सत्रात दिव्यांग बंधू,- भगिनी व्दारे उत्कृष्ट समूहगीत, प्रेरणा गीत, देशभक्तीपर गीत, नाच सादर करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजिका सौ. अर्चना श्रावणे होत्या.
समारोप प्रसंगी समाज कल्याण विभागाचे नागपूर चे अधिकारी उपस्थित होते. तसेच अधिवेशनात दिव्यांगांच्या विविध समस्या, दिव्यांग शाळा व संस्था यांच्या अडचणी व त्यावर अभ्यासपूर्ण उत्तर शोधून विविध प्रस्ताव पारित करून त्याचे निवेदन सरकारला देण्यात येईल असे ठरविण्यात आले प्रस्ताव वाचन सौ. मिनल संगोळे यांनी केले व त्यानंतर प्रांत सचिव श्री. संजय जी दंडे यांचे व्दारे अधिवेशनाचे समारोप करण्यात करण्यात आले. आभार प्रदर्शन अधिवेशनाचे सहसंयोजक श्री मनीष केसरवानी यांनी केले.
त्यानंतर एक दिव्यांगफेरी / Rally रेशीमबाग वस्तीतून काढण्यात आली व फेरीनंतर दिव्यांग अधिवेशनची सांगता झाली. "दिव्य-क्षम २०२४" अधिवेशनाचे प्रमुख सूत्र संचालन सौ. मंजुषा मेश्राम तसेच उपसूत्र संचालन सौ. प्रणिता ढोबळे आणि अनुवादक नात्याने सौ. नेहा चेपे यांनी केले.
अधिवेशनाच्या यशस्वीते साठी सक्षम विदर्भ प्रांत संघटन मंत्री श्री. आशुतोषजी देशपांडे, नागपूर महानगर अध्यक्ष डॉ. मिलिंद हरदास, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. अविनाश अग्निहोत्री, श्री रामदेव जी अग्रवाल, यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली विविध समित्या स्थापन करुन व्यवस्था आणि जबाबदाऱ्या नियोजित केल्या होत्या. श्री संजय पाटील, श्री विनोद ढोबळे, श्री धनंजय उपासनी, ऍड. श्री. अर्जुनसिंग बघेल, श्री संजय बोभाटे, श्री उदयकुमार राव, श्री अजित चौधरी, श्री विश्वास पत्तरकीने, श्री राजीव गोखले, श्री अरुण पालांदुरकर, श्री सचिन देशपांडे, सौ अपर्णा मोहतकर, सौ देशपांडे, श्री कमलकिशोर सारडा, श्री. ब्रजलाल हुरकट, श्री दिनेश शर्मा, श्री सुनील पारेख, सौ वृंदा देशपांडे, सौ. अर्चना चित्रे, श्री. शैलेश खोंड, श्री धर्मेश पटेल, श्री राजू भगत, कु. सिद्धी किटकरू, कु. शताक्षी पथे कु. इशिका केसरवानी इत्यादींनी अधिवेशन यशस्वीतेसाठी भरपूर परिश्रम घेतले.
वृत्तांकन
डॉ. संदीप पथे
(अधिवेशन संयोजक )